महिलांना फसवणाऱ्या लखोबाच्या पोलिसांनी १२ तासात आवळल्या मुसक्या 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तीन महिलांना घटस्फोटित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या विवाहित मजनूच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासात मुसक्या आवळल्या. मजनूने पीडित महिलांची आर्थिक लुबाडणूक केल्याचेही तपासात उघड झाले. शादी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याने घटस्फोटित महिलांशी संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढले होते. अमित प्रवीण घरडे, असे त्याचे नाव असून हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या एका घटस्फोटित महिलेला दगा दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

आरक्षणासाठी धोबी समाज राज्यभर जेलभरो करणार
जळगाव : सामाजिक न्यायाच्या भूमिकेने सर्वच समाजाच्या मागण्यांची दखल राज्यशासन घेत आहे. मात्र, धोबी समाजाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्यातील धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या सवलती लागू कराव्यात. यासंबंधी शासनाकडे २००२ पासून धूळखात पडून असलेल्या पुनर्विलोकन अहवाल शिफारशीसह केंद्राकडे तत्काळ पाठवाव्यात. अन्यथा, राज्यातील तमाम धोबी समाज छोट्या-छोट्या जात समूहांना एकत्र करून जेलभरो आंदोलनात अटक करून घेऊन मागणी मान्य होईपर्यंत जामिन घेणार नाही, अशी टोकाची भूमिका घेईल, असा इशारा अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांनी दिला आहे.
जळगावमधील केमिस्ट भवनात महाराष्ट्र परिट (धोबी) समाजाची उत्तर महाराष्ट्र विभागीय चिंतन बैठक शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी बैठकीत बोलताना हा इशारा दिला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे हे होते. विचारपीठावर केंद्रीय उपाध्यक्ष कचरू पाचंगरे, प्रदेशाध्यक्ष विजय देसाई, विभागीय अध्यक्ष पंडित जगदाळे, स्वागताध्यक्ष विवेक ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्षा प्रतिभा गवळी, कार्याध्यक्ष ईश्वर मोरे, उपाध्यक्ष राजेंद्र सोनावणे, जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र राम जाधव, आरोग्य समितीचे अध्यक्ष गोपी चाकर, डेबूजी युथ ब्रिगेडचे गिरीष शिरसाळे, धुळेजिल्हाध्यक्ष सुनील सपकाळ, नाशिक जिल्हाध्यक्ष दत्ता पवार, प्रदेश प्रतिनिधी तुळशीदास येवलेकर आदी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुण शिरसाळे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी संपूर्ण जिल्ह्याची फळी राज्य संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

समाजाच्या या बैठकीप्रसंगी माजी नगरसेवक वासुदेव सोनवणे व सुमित्रा सोनवणे या दाम्पत्याला जीवनगौरव, प्रा. राजेश जाधव यांना समाज विभूषण, ईश्वर मोरे यांनी समाजभूषण, परीट (धोबी) शिक्षक-शिक्षकेतर संस्थेला समाज कोहिनूर, अरुण राऊत यांना समाजरत्न व आशाताई वाघ यांना समाजमित्र गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक दीपक सपकाळे सर यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र सपकाळे यांनी तर, आभार अर्जुन मांडोळे यांनी मानले. बैठकीला जळगाव जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी, तालुका पदाधिकारी, समाजातील स्त्री-पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.