पोलिसांनी कारवाई केल्यामुळे गुंडाने केला चाकूने वार

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनातही नागरिकांच्या हितासाठी काम करणार्‍या पोलिसांवर काही गुंडानी जीवघेणा हल्ला केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये घडली आहे. वाळू चोरांवर कारवाई केल्याच्या रागातून गुंडांनी पोलीस कर्मचार्‍यावर चाकू हल्ला केला आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

हल्ल्यामध्ये रवी चौधरी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शहरातल्या पोलिसांवर असा जीवघेणा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न समोर येत आहे. कन्हानमधील गौरहिवरा चौकावरची काल रात्री नउ वाजता चौधरी ड्यूटीवर असताना काही गुंड तिथे आले. त्यांनी रवी यांच्यावर चाकूने वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेले आहे. उपस्थित स्थानिकांनी नागरिकांनी तात्काळ रवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वाळू चोरी करणार्‍या ट्रकवर पोलिसांनी कार्यवाही केल्यामुळे हल्लेखोरांनी अशा प्रकारे बदला घेतल्याचे सांगण्यात येत आहे.