चितगिरी दरोडा प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन

भोकर:पोलीसनामा ऑनलाईन

भोकर तालुक्यातील चितगिरी येथे अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीमध्ये झालेल्या भांडणातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते आट्रोसिटी विरुद्ध दरोडा असा गुन्हा दाखल झाले होते.शेतात अडवणूक करून पैसे काढून घेतल्याची तक्रारिवरून दरोड्याची फिर्याद दिल्यामुळे त्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c192865-c3f4-11e8-8ca0-cfa2c2375ad4′]

चितगिरी येथील आरोपी चंदू सूर्यवंशी,विठ्ठल दशरथ सूर्यवंशी, माधव गोविंद सूर्यवंशी, दिगंबर लक्ष्मण एडके यांच्या विरुद्ध भोकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २४६/१८ मध्ये कलम ३९२,३२४,३४१ भादवी नुसार फिर्यादी माधव कदम यांच्या तक्रारी अर्जावरून गुन्हा दाखल केला होता.
[amazon_link asins=’B017OWDX64,B01BHLEPO2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9beb36e3-c3f4-11e8-ba8c-01fba4ddcfa0′]

भोकर जिल्हा सत्र न्यायालय यांनी या प्रकरणात चारही आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला असून आरोपीची बाजू अॅड.अनिल सिलेमाने यांनी पाहीले.ह्या प्रकरणातील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अभय देशपांडे व पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद शरफोद्दीन(उप पोलीस निरीक्षक,भोकर),संभाजी हनवते(जमादार) हे करत आहेत.

पुणे : एफटीआयआयमध्ये (FTII) प्रोजेक्ट दरम्यान विद्यार्थी २२ फुटांवरून खाली कोसळले

जाहीरात.