6 वी ते 8 वी च्या 17 विद्यार्थीनींचा विनयभंग करणार्‍याला आईच्या ‘शिफारशी’वरून नोकरी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आईच्या शिफारशीवरून शाळेत शिकवायला लागलेल्या शिक्षकाने सहावी ते आठवी च्या १७ मुलींचे विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तो अविवाहित आहे एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तो संगणक शिक्षकाची नोकरी तो करत होता.

अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्या प्रकरणी मुंबई पोलिसानी त्या शिक्षकाला अटक केलेली आहे. आरोपी डोंबिवलीचा राहणारा असून अविवाहित आहे. एका सामाजिक संस्थेमार्फत तो पालिकेत चार महिने संगणक शिक्षकाची नोकरी करत होता. यादरम्यान शाळेने ठरवलेल्या वेळापत्रकाव्यतिरिक्त मुलींना प्रशिक्षणासाठी बोलावून तो त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. त्यामध्ये दिव्यांग मुलीचाही समावेश आहे. काही मुलींनी हि सर्व घटना शिक्षकांना दाखवली नंतर त्या शैक्षणिक संस्थेने त्याला निलंबित करून त्याच्या विरुद्ध पोलीसांकडे तक्रार केली.

आरोपी आईच्या नावाचा वापर करून सदर शाळेत नोकरीला लागला होता. त्याच्या आईने सदर शाळेत काम केलेले असल्याने त्याच शाळेत संगणक शिक्षक म्हणून नोकरीची संधी देण्याची मागणी त्यांनी संस्थेकडे केली होती. त्याअगोदर तो संस्थेत अकाउंट चे काम पाहत होता. त्याअगोदर त्याने चार वेळा संगणक शिक्षकांचे काम केल्याचे समोर आले आहे. त्याने डोंबीवलीसह, ठाणे मधील अनेक खासगी शाळेचा यामध्ये समावेश आहे. त्याने पुर्वीही अश्या प्रकारची कृत्ये केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यानुसार पोलिसांकडून त्याच्या पूर्व कामांच्या ठिकाणीही चौकशी केली जाणार आहे.