राजगृह हल्ला प्रकरणातील आरोपी ठाण्यात दिसला ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानावर हल्ला करणारा आरोपी मोकाट फिरताना दिसला आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे, राजगृहावर तोडफोड करणारा हल्लेखोर ठाण्यातील हात नाका येथील चौकातून चालत जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा आरोपी पुढे भिवंडीच्या दिशेने चालत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

राजगृहावर हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीत हात नाका चौकातून चालत जाताना दिसत आहे. पोलीस या आरोपीच्या मागावर असून, लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास माटुंगा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एका आरोपीस झाली अटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथल्या निवास स्थानी ७ जुलैला हल्ला करणाऱ्या एका आरोपीस नऊ जुलै रोजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेल टीटी भागात राहणारा हा आरोपी असून त्याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांनी अधिक तपास केला असता सीसीटीव्ही आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर संशयित आरोपीचं मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, पोलिसांनी प्रेस भागात राहणाऱ्या उमेश जाधव (वय ३५) या तरुणाला अटक केली आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे. त्याने हे कृत्य का केलं याबाबत पोलसांनी अजून खुलासा केला नाही तर मुख्य आरोपी अजूनही सुद्धा पोलिसांच्या हाती लागला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी राजगृह हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्व आहे.