बलात्कार प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणातून अरोपीची पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. अतिश सुरेश दरेकर (वय २०, रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल झाला होता.

बालकाच्या अपहरण प्रकरणी दाम्पत्यास जामिन  

सदर घटना १७ ऑगस्ट २०१६ रोजी घडली होती. अरोपीच्या वतीने अ‍ॅड. श्रीकृष्ण घुगे, अ‍ॅड. प्रझा उबाळे, अ‍ॅड. दयानंद लोंढे, अ‍ॅड. तेजल पुराणिक आणि रश्मी रंगारी यांनी काम पाहिले. अ‍ॅड. श्रीकृष्ण घुगे यांनी सदर प्रकरणात अल्पवयीन मुलगी व मुलगा हे वेगळ्या समाजातील असल्यामुळे अरोपीला सदर प्रकरणात अडकवण्यात आले असून अरोपीला गोवा येथून ताब्यात घेतल्याचे सरकार पक्ष सिध्द करू शकले नाही. घरच्या लोकांच्या त्रासामुळेच पिडीताने घर सोडले होते. संशायावरून अरोपीविरोधात पिडीताच्या आईने फिर्याद दिल्याचा युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणात चार साक्षिदारांची साक्ष नोदंवण्यात आली. आरोपीच्या वतीने केलेला युकतीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

Loading...
You might also like