बलात्कारातील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी : उमा खापरे

शिक्रापुर : प्रतिनिधी –   शिरुर तालुक्यातील पाबळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची निंदनीय घटना घडली असून त्या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.दोन दिवसापुर्वी शिरुर तालुक्यातील पाबळ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी पाबळ येथे पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत शिक्रापूर पोलीस स्टेशनला भेट दिली, यावेळी घडलेल्या घटनेबाबत सखोल तपास लावण्याची मागणी खापरे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली .तर राज्यात दिवसेंदिवस महिला व मुलींवरील अत्याचार वाढत असून सरकारचे याकडे लक्ष नसल्याचे सांगत सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या बदलण्यासाठी राजकारण केले आहे .त्या जागेवर अद्याप महिला अध्यक्ष नेमलेली नसून महिला आयोगावर त्वरित महिला अध्यक्षा नेमण्याची मागणी देखील सरकारकडे केली आहे तसेच महिलांना सुरक्षित ठेण्याचे काम सरकारने करावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आणू नये असे देखील यावेळी उमा खापरे यांनी सांगितले आहे.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महिलाप्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, सरचिटणीस अॅड. वर्षा डहाळे, भारतीय जनता पार्टीचे शिरूर आंबेगाव अध्यक्ष सतीश पाचंगे, शिरूर तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र भुजबळ, भाजपाचे नेते जयेश शिंदे, शिरूर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मांढरे, नवनाथ सासवडे, माऊली साकोरे, संदीप साकोरे यांसह आदी उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like