आ. राहुल कुल यांच्या जीविताला धोका असल्याची अफवा पसरवणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

अब्बास शेख

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या जीविताला धोका असल्याचे मेसेज बोगस  सिमच्या आधारे पाठवून अफवा पासरवणाऱ्या  दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत दौंड न्यायालयाने पुन्हा तीन दिवसांची वाढ केली आहे.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’221af113-c7e1-11e8-982c-c1018a357143′]

या अगोदर आरोपींना न्यायालयाकडून ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली  होती. आज त्याची मुदत संपत असल्याने यवत पोलिसांनी आरोपींना दौंड न्यायालयासमोर हजर केले असता दौंड न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत ७ ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’104fbc16-c7e1-11e8-b1e2-bd1780d292bb’]
आमदार कुल यांच्याबाबत अफवेचे मेसेज पसरविणाऱ्या  आरोपींनी पाटस येथील मोबाईल शॉपीमध्ये नवीन सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या  एका परप्रांतीय ग्राहकाची सिमकार्डसाठी लागणारी कागदपत्रे घेऊन त्या आधारे परस्पर सिम चालू करून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या जीवाला धोका असल्याचे अफवेचे  मेसेज पाठवण्यात आले होते. हे मेसेज थेट पोलीस अधीक्षकांनाही पाठवण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याबाबत पुणे ग्रामीण  स्थानिक गुन्हे शाखेच्या (Lcb)  पथकाला चौकशीचे आदेश दिले होते यामध्ये स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सहा.पोलीस निरीक्षक जी.ए क्षीरसागर, जी.वाय गायकवाड, पोलीस नाईक महेश वसंत गायकवाड, राऊत, कांचन, जाधव यांच्या पथकाने सखोल चौकशी केली असता आरोपी सागर विनायक भानवसे रा. वरवंड ता दौंड याने आरोपी आकाश राजेंद्र होले रा.गारफाटा पाटस,  याच्याकडून त्याच्या पाटस येथील मोबाईल शॉपीमधून एका ग्राहकाची सिमसाठी लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन त्यावर परस्पर सिम नंबर ९१४५०३८२१५ हा चालू करून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार केल्याचे  तपासात पुढे आले होते. यानंतर वरील दोन्ही आरोपींना  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद करून यवत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. वरील आरोपींबाबत अजूनही काही माहिती मिळवायची असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती यवत पोलिसांनी दौंड न्यायालयात केली होती त्यास दौंड न्यायालयाने सात तारखेपर्यंत वाढ केली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’31c568cc-c7e1-11e8-98ee-6b7ffec913dc’]

गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप कारणीभूत : खासदार बारणे