Wardha News : मद्यधुंद जावयाकडून 64 वर्षीय सासूला जबरदस्ती दारू पाजून अत्याचार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यधुंद नराधम जावयाने आईसमान असलेल्या 64 वर्षीय वृद्ध सासूला जबरदस्ती दारू पाजून बळजबरी अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना आर्वी शहरात घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जावाई सचिन आणि वृद्धेच्या मुलीचा 2012 मध्ये प्रेमविवाह झाला होता. जावई सचिन हा सेंट्रींगचे काम करायचा. मात्र, दोघांमध्ये नेहमीच घरगुती कारणातून वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीही वृध्देची मुलगी आणि पती सचिन यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता. त्यामुळे ती नागपूर येथे गेली होती. याचाच फायदा घेवून जावई सचिन हा घरी आला होता. त्याने मेहुण्याला पनीर आणण्यासाठी बाहेर पाठविले. घरी कुणी नसल्याचे पाहून जावाई सचिनने सासूला जबरदस्ती दारू पाजली. काही वेळानंतर मेहुणा पनीर घेवून घरी आला. त्यानंतर सचिनने स्वत:च्या हाताने पनीरची भाजी बनविली. दोघांनी जेवण केले. त्यानंतर जावायाने मेहुण्याला पुन्हा खर्रा आणण्यासाठी बाहेर पाठविले. मुलगा घराबाहेर पडताच सचिनने सासूवर बळजबरी अत्याचार केला. वृद्ध सासूने ही बाब दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला सांगितली. तसेच नागपूर येथे गेलेल्या तिच्या मुलीला दुरध्वनीवरून संपर्क करून सांगितली.

यापूर्वीही मुलगी बाहेरगावी गेली असता डिसेंबर 2019 मध्ये जावाई सचिन याने घरात प्रवेश करून वृद्ध सासूवर बळजबरी अत्याचार केला होता. मात्र, बदनामी खातर वृद्धेने ही बाब कुणालाही सांगितली नव्हती. मात्र, पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने वृद्धने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जावायाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.