खडकी येथील सीएसडी कॅन्टीनमधून प्रेशर कुकर चोरणारे अटकेत

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

 

खडकी रेंजहिल्स येथील कॅन्टीन भंडार विभागात (सीएसडी) कंटेनरमधील सामानाची चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी कंटेरच्या पाठीमागील दरवाजाचे कुलुप तोडून आतील ४८ हजार ६५१ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. ही घटना बुधवारी (दि.१९) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1607c38c-be62-11e8-9979-ddc633d42230′]

प्रभाकर उर्फ देव्या कमलाकर शिंदे आणि शुभम भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुभाषचंद्र बाबुलाल यादव (वय-३३ रा. चिंबळी फाटा,चाकण) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस पतीवर कॉन्स्टेबल पत्नीकडून बलात्काराचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हे एक्सप्रेस कार्गो कंपनीच्या कंटनेवर चालक म्हणून काम करतात. एक्सप्रेस कार्गो कंपनीकडून राज्यातील सर्व ठिकाणच्या मिलेटरी कॅन्टीनचे सामान पोहचवण्यात येते. मंगळवारी (दि.१८) यादव यांनी चाकण येथील गोडाऊनमधून कॅन्टीनचे सामान कंटेनरमध्ये भरुन ते खडकी येथे आणले. कंटनेरमधील सामान उतरवण्यास उशिर झाल्याने यादव यांनी कॅन्टीनच्या समोरील मोकळ्या जागेत कंटेनर पार्क केला. चोरट्यांनी कंटेनरचा मागील दरवाजाचे कुलुप तोडून आतील युनायटेड कंपनीचे प्रेशर कुकरचे ३ बॉक्समधील ३६ कुकर, प्रेमिया कंपनीचे इलेक्ट्रीक वॉटर हिटर असा एकूण ४८ हजार ६५१ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. बुधवारी सकाळी यादव हे कंटेनरमधील सामान खाली करण्यासाठी आले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bafe3f1-be62-11e8-916d-2d1aee86e6f4′]

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उप निरीक्षक मदन कांबळे यांनी सीएसडीमधील सामानाची चोरी करणाऱ्यांची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांना अटक करुन चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

उच्चभ्रू कुटुंबाकडे खंडणी मागणारे दोन इंजिनियर वाकड पोलिसांच्या जाळ्यात

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, सहायक पोलीस आयुक्त कल्याण राव विधाते, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे पोलीस उप निरीक्षक मदन कांबळे, निलेश महाडिक, पोलीस कर्मचारी विशाल मेमाणे, अनिरुद्ध सोनवणे, ठोकळ आण्णा, हेमंत माने, अनिल जाधव, गणेश लोखंडे, किरण घुटे, संदीप गायकवाड, धवल लोणकर यांच्या पथकाने केली.

[amazon_link asins=’B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c97562b0-be73-11e8-b76d-83da517424c0′]