आयुष्यमान खुराणाने ‘या’ चित्रपटाची कथा चोरली ?

मुंबई : वृत्तसंस्था – ‘अंधाधुन’ आणि बधाई हो चित्रपटात दमदार अभिनय करणारा अभिनेता आयुष्यमान खुराणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयुष्यमान खुराणाचा आगामी ‘बाला’ चित्रपटावरून वाद सुरु झाला आहे. आयुष्मानची मुख्य भूमिका असलेला ‘बाला’ चित्रपटाची कथा चोरल्याच्या आरोपाखाली आयुष्यमान तसेच ‘बाला’ चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

सहाय्यक दिग्दर्शक कमल कांत चंद्रा यांनी बालाची कथा चोरल्याचा आरोप अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता यांच्यावर केला आहे. कमल कांत चंद्रा म्हणाले, आयुष्यमान खुराणा, निर्माता दिनेश विजन व दिग्दर्शक अमर कौशिक यांनी माझ्या ‘विग’ या चित्रपटाची कथा चोरली आहे.

एका ताज्या मुलाखतीत कमल कांत यांनी माहिती देत सांगितले, ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी आयुष्यमानला भेटून माझ्या ‘विग’ चित्रपटाची कथा ऐकवली होती. आयुष्यमानला कथा आवडल्यानंतर या कथेचा सार मी त्याला व्हॉट्सअप केला होता. तो वाचून आयुष्यमानने मला भेटायलाही बोलवले. पण मी भेटायला गेल्यावर आयुष्यमान बिझी असल्याचे कारण मला सांगितले गेले. यानंतर अनेकदा मी आयुष्यमानकडे या कथेबद्दल पाठपुरावा केला. पण त्याच्या कडून काही उत्तर आले नाही. आता तो माझ्या या कथेवर आधारित चित्रपट घेऊन येतोय.

या प्रकारानंतर कमल कांत यांनी आयुष्यमान, दिनेश विजान व अमर कौशिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली. पण या नोटीसकडे तिघांनीही दुर्लक्ष केले. यानंतर कमल कांत यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आयुष्यमानचा हा आगामी चित्रपट युवावस्थेत टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. याबाबत स्पष्टीकरण देत ‘बाला’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी सांगितले, मला याबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही या चित्रपटाच्या कथेवर गेल्या चार -पाच महिन्यांपासून काम करत आहोत. दोन्ही कथांमधील पात्रांचे साम्य कदाचित योगायोग असवा. मीना कमल कांत यांची स्क्रिप्ट ऐकली ना त्यांना कधी भेटलो. केसचे म्हणाल तर त्याला कसे उत्तर द्यायचे ते निर्माता ठरवेल, असे त्यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like