अहमदनगर : आरोपीचा पोलिस स्टेशन मध्येच आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लघवी करण्याच्या बहाण्याने कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या शौचालयात आरोपीने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करत पोलिसांना धमकावत त्यांच्यावरही ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. काल दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला चांगदेव भारम भोसले (वय ३६ रा. पढेगाव, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल मंगळवारी दुपारच्या सुमारास कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यातील पोलिस कस्टडी रिमांडमधील आरोपी चांगदेव भारम भोसले यास तपासकामी कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येथे आणले. त्याने लघवीचा बहाणा करत शौचालयामध्ये जावून स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले. तुम्हाला सगळयांना कामाला लावतो, अशी धमकी देऊन पोलिसांशी झटापट केली व त्याच्या हातातील ब्लेडने त्यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी बळाचा वापर करून आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडील ब्लेडही ताब्यात घेतले आहे.

जखमी आरोपीस तात्काळ कोपरगाव ग्रामिण रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करून त्यावर औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सदर आरोपीविरूध्द श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –