देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांवर मोक्का

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विकास खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.

साबीर समीर शेख (१९, रा. देहूरोड), जॉनी उर्फ साईतेजा शिवा चिंतामल्ला (१९, रा. देहूरोड), आफताब समीर शेख (रा. देहूरोड) अशी मोक्काची कारवाई झालेल्याची नावे आहेत. नगरसेवक खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन देहूरोड बाजारपेठ बंद ठेवल्याचा राग मनात धरुन खंडेलवाल यांच्या दिशेने गोळीबार केला. खंडेलवाल मागे सरकल्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खंडेलवाल ओरडत पळत असताना पाय-यांवर पडले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला मार लागला.

दरम्यान, घटना घडल्यानंतर खंडेलवाल यांच्या ओळखीचे राजेश खंडेलवाल आरोपींच्या दिशेने पळाले असता आरोपींनी राजेश यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दोन्ही आरोपी मोटारसायकल वरून पळून गेले. देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल देखील जप्त केली. आफताब शेख अद्याप फरार आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी आरोपींवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मान्यता देऊन तिघांवर मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like