दिल्लीमधील ‘आतंक’वादी हल्ल्याच्या कटात सहभागी होता कासिम सुलेमानी : डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बगदाद येथे झालेल्या हवाई हल्याबाबत आता अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, ‘अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेल्या इराणचा सर्वोच्च कमांडर कसीम सोलेमानी यांचा ‘नवी दिल्ली आणि लंडनमधील दहशतवादी कारस्थान रचण्यात’ भूमिका होती. ट्रम्प यांनी सुलेमानीवर हल्ला करण्याच्या निर्णयाचा बचाव करत म्हटले की ‘दहशतवादाचे राज्य संपले आहे’.

दरम्यान, जनरल सुलेमानी इराणच्या अल-कुदस दलाचे प्रमुख होते. शुक्रवारी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सुटलेल्या आपल्या ताफ्यावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ते ठार झाले आहेत. या हल्ल्यात इराणच्या शक्तिशाली हशद अल-शाबी अर्धसैनिक बलाचे उपप्रमुख आणि इतर काही इराण समर्थीत स्थानिक मिलिशियाही ठार झाले आहेत.

ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या मार-ए-लागो येथे पत्रकारांना सांगितले की, “इराकमध्ये अमेरिकेला लक्ष्य करुन अनेक रॉकेट हल्ले करण्यात आले, त्यात एक अमेरिकन नागरिक ठार झाला असून चार अमेरिकन सैनिक गंभीर जखमी झाले.” याशिवाय सुलमानी यांच्या आदेशानुसार बगदादमधील आमच्या दूतावासावर हिंसक हल्ला करण्यात आला. ते म्हणाले, ‘सुलेमानीने आपल्या वाईट हेतूने निरपराध लोकांना ठार केले आणि नवी दिल्ली आणि लंडनमध्येही दहशतवादी हल्ल्याच्या कटात भूमिका बजावली. आज आम्ही सुलेमानीच्या क्रौर्याचा बळी पडलेल्यांना लोकांना आठवत आणि त्यांचा आदर करत आहोत. त्याचे दहशतवादाचे राज्य आता संपले आहे, आम्हाला आता शांती मिळेल.

ट्रम्प म्हणाले की, सुलेमानी गेली 20 वर्षे पश्चिम आशियाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी कार्यात सहभागी होते. ते म्हणाले की अमेरिकेने शुक्रवारी जे केले ते आधीच करायला हवे होते, ज्यामुळे बऱ्याच लोकांचे जीवन वाचले असते. अलिकडे सुलेमानी यांनी इराणमधील निदर्शकांवर निर्दयतेने दडपण आणले. तसेच इराणबरोबर वाढत्या तणावावर ट्रम्प म्हणाले की, सुलेमानीच्या मृत्यूने युद्धाला सुरुवात होणार नाही. ते म्हणाले, ‘काल रात्री आम्ही युद्ध थांबविण्यासाठी कारवाई केली. आम्ही युद्ध सुरू करण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. ते उत्कृष्ट लोक आहेत आणि त्यांची क्षमता अमर्यादित आहे. आम्हाला प्रशासनात बदल नको आहे.

त्याचवेळी, युरोपियन युनियनमधील परराष्ट्रमंत्री जोसेप बोरेल यांनी शुक्रवारी सांगितले की, इराकमध्ये ‘हिंसाचार चक्र नियंत्रणातून बाहेर येण्यापूर्वी’ हे थांबवले पाहिजे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की या नाजूक प्रसंगी युरोपियन युनियनने संयम ठेवण्यासाठी आणि सर्व जबाबदार वृत्ती अवलंबण्यासाठी सहभागी सर्व पक्षांना आवाहन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/