Achalpur Violence Case | अचलपूर हिंसाचार प्रकरणात भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला पुण्यातून अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन : Achalpur Violence Case | अचलपूर येथील झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी (Amravati Police) मोठी कारवाई केली आहे. अचलपूर येथील दोन गटात झालेल्या हिंसाचार प्रकरणात (Achalpur Violence Case) पोलिसांनी भाजप शहराध्यक्ष अभय माथने (BJP City President Abhay Mathane) याला पुण्यातून अटक (Arrest In Pune) केली आहे. हिंसाचार प्रकरणात भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (Amravati Police Arrest BJP City President Abhay Mathane From Pune)
अभय माथने याने झेंडा (Flag) लावला असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर हा वाद झाला. अचलपूर हिंसाचार प्रकरणात (Achalpur Violence Case) आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना (Amravati IG Chandrakishore Meena) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
–
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील (Dulha Gate Area) झेंडा काढल्याचा
वादावरुन दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जमावाला
पांगवून पोलीस बंदोबस्त वाढवला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अचलपूर
परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात संचारबंदी Curfew (कलम 144) लागू केली.
अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी
विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक
झाली असून वाहनांची तोडफोड (Vehicle Vandalism) सुद्धी झाली. तर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधूर सुद्धा सोडले.
Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक
ST Workers Strike | एसटी कामगार कामावर हजर होण्यास सुरुवात; एका दिवसांत 15,185 कामगार परतले