राजेंद्र सरग यांना आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकार पुरस्कार प्रदान

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ शिक्षणतज्ञ तसेच माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले आणि माजी न्‍यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. पुण्‍याच्‍या विनोद विद्यापीठ येथे आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्‍कार देण्‍यात येतो.

राजेंद्र सरग सध्‍या पुण्‍याला जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून सेवेत आहेत. राजेंद्र सरग यांना यापूर्वी महाराष्‍ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तसेच इतर पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64eb777f-a079-11e8-8406-9d207b394c85′]

आचार्य अत्रे मराठी संस्कृती जपणारे एक बहुगुणी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार ज्या मान्यवरांनी स्वीकारले त्यांची सामाजिक जबाबदारी वाढली आहे. आचार्य अत्रे ह्या नावाचे वलय प्रत्येक क्षेत्रात आहे. राजकारण, साहित्य, समाजकारण, नाटक, चित्रपट, लेखक अशा विविध कलागुणांनी समृध्‍द असणारे व्यक्तीमत्व म्हणजे अत्रे, असे प्रतिपदन निवृत्त न्यायमूर्ती श्री. प्रमोद कोदे यांनी केले.

कार्यक्रमात नाट्यकर्मी अशोक समेळ, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बाबुराव कानडे, शाल्‍मली कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

निवृत्त न्यायमुर्ती श्री. कोदे म्हणाले, आचार्य अत्रे ही व्यक्ती मराठी मनांवर अधिराज्‍य गाजवते. मराठी संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले. हास्याचा बुध्दीशी संबंध आहे त्यामुळेच विनोद निर्माण करणारी व्यक्ती बुद्धीवंत असते. आजच्या युगात हसण्यावर मर्यादा येत आहे, पण पोटभर हसणे गरजेचे आहे. व्यंग किंवा विनोद जीवघेणा नसावा याचे भान असले पाहिजे. हसणे ही जीवनाची संजीवनी आहे. प्रारंभी आचार्य अत्रे यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यावेळी अनेक रसीक उपस्थित होते.