कर्नाटकात विजयी मिरवणुकीत अॅसिड हल्ला

कर्नाटक : वृत्तसंथा

कर्नाटकमधील तुमकुर येथे काँग्रेसच्या विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यात आठ जण जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. तुमकुर येथे काँग्रेसचे उमेदवार इनायतुल्ला खान यांनी निवडणुकीत बाजी मारली. कर्नाटकमधील स्थानिक स्वराज संस्थासाठी ३१ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले होते.
[amazon_link asins=’B0073C7IIK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df90b609-af74-11e8-a81a-ddffea56d495′]

कर्नाटकमध्ये महापालिका निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. तुमकुर येथे काँग्रेसचे उमेदवार इनायतुल्ला खान यांनी निवडणुकीत आघाडी मारली. यानंतर इनायतुल्ला खान यांच्या समर्थकांनी प्रभागात विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तींनी अॅसिड हल्ला केला. यात आठ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या हल्ल्यामागे कोण आहे, हल्ल्याचा उद्देश काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

जाहिरात

कर्नाटकमध्ये महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. राज्यातील म्हैसूर, शिवमोगा आणि तुमाकुरू या जिल्ह्यांमधील नगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायतींसाठी हे मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकांसाठी ६७ टक्के मतदान झाले होते.
नायब तहसिलदार तिसर्‍यांदा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात 

राज्यातील २,७०९ जागांवर ही निवडणूक पार पडली. या जागांसाठी मतमोजणी झाली. यात काँग्रेस सुमारे ९५० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसला ८६४, भाजपला ७८८ तर जेडीएस आणि अपक्षांना २७७ जागांवर विजय मिळाला आहे.

जाहिरात

You might also like