पुण्यात महिलेच्या तोंडावर ‘अ‍ॅसिड’ हल्‍ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवार पेठेत आलेल्या एकाचे देहविक्रय करणाऱ्या महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या तोंडावर त्याने टॉयलेट क्लीनींग करण्यासाठी वापरले जाणारे असिड फेकण्यात आल्याचा प्रकार सपना बिल्डींगमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला. या घटनेत महिलेच्या डोळ्यांना इजा झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर असिड फेकणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

विष्णू गोपाल परमानी (वय २०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो पुण्यात एका हॉटेलमध्ये कामाला आहे.

बुधवार पेठेतील सपना इमारतीमध्ये संबंधित देहविक्रय करणाऱी महिला राहते. दुपारी तिच्याकडे विष्णूगोपाल आला. तो तेथीलच एका हॉटेलमध्ये काम करतो. तर संबंधित महिला सपना बिल्डींगमध्ये देहविक्रय करते. दोघेही कोलकत्ता येथील राहणारे आहेत. त्यामुळे त्यांची ओळखही आहे. त्याचे नेहमी संबंधित महिलेकडे येणेजाणे असते. आज दुपारी त्याच्याशी तिचे काही कारणावरून वाद झाले. त्यानंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. तेव्हा त्याने तेथील एका बाटलीतील टॉयलेट साफ करण्यासाठी वापरले जाणारे असिड महिलेच्या तोंडावर फेकले. त्यावेळी आसपासच्या महिलाही तेथे जमल्या होत्या. त्यानंतर काही काळ मोठा गोंधळ उडाला. फरासखाना पोलीसांना याची माहिती देण्यात आली. पोलीसांनी तेथे धाव घेऊन महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले तर असिड फेकणाऱ्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

https://youtu.be/XgE8E9moLIc

महिलेशी काही कारणावरून संबंधिताचे वाद झाल्याने त्याने असिड फेकले आहे. हे असिड टॉयलेट साफ कऱण्यासाठी वापरले जाणारे असिड आहे. महिलेच्या डोळ्यात आणि नाकात असिड गेले असून किरकोळ इजा झाली आहे. तर तरुणाला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली आहे.

सिनेजगत

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

ऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

 

 

 

Loading...
You might also like