ॲसिडीटीच्या समस्येनं त्रस्त आहात ? जेवणापूर्वी करा फक्त ‘हे’ एक काम !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तिखट किंवा मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळं अनेकांना गॅस आणि पित्ता सारख्या समस्या उद्भवतात. पोटाशी संबंधित अशा समस्यांचा त्रास हा कुणालाही होऊ शकतो. काही लोकांच्या तर या समस्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. अनेकजण यावर विविध उपाय करतात. परंतु त्यांना फरक पडतही नाही या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नेमंक काय केलं पाहिजे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

ॲसिडीटी सारख्या समस्या टाळण्यासाठी काय केलं पाहिजे ?
जेवणापूर्वी आल्याचा एक तुकडा घ्यावा. यात लिंबाच्या रसाचे दोन किंवा तीन थेंब व काळं मीठ किंवा साधं मीठ टाकून मिश्रण तयार करून घ्यावं. हे मिश्रण दातांच्या खाली ठेवून चावावं आणि पाणी प्यावं. यामुळं गॅस आणि ॲसिडिटी पासून आराम मिळतो. रोज जर हा उपाय केला तर यामुळं खूप फायदा मिळतो.

आयुर्वेदात असं सांगितलं आहे की, आल्यात भूक, पचनशक्ती वाढवण्यासोबतच जिभेची चव वाढवण्याचे गुण असतात. आपल्याला मळमळ होत असेल किंवा उलटी सारखं वाटत असेल तर यासाठी आलं फायदेशीर ठरतं. मीठामुळं पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचं प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील मीठाच्या सेवनाचा फायदा होतो.

आयुर्वेदात सांगितलं आहे की, पचनसंस्था जर व्यवस्थित काम करत नसेल तर पोटात अनेक प्रकारचे घातक पदार्थ तयार होतात. त्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढतं. तसंच रक्तवाहिन्यांमधून अडथळा निर्माण होऊन रक्तप्रवाहावर परिणाम होतो. आलं खाल्ल्यामुळं पोटाच्या अनेक विकारांपासून सुटका मिळण्यासोबतच भविष्यात होणाऱ्या कोलेस्ट्रॉल वाढण्यासारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येतं.

अनेकजण असेही आहेत जे तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास होतो म्हणून त्यांच्याच मनानं औषधं घेतात. परंतु असं करणं नुकसानदायकही ठरू शकतं. जर तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास असेल तर यावर परस्पर गोळ्या औषधं घेणं टाळलं पाहिजे. जर हा त्रास जास्त असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त उत्तम ठरेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.