वेळोवेळी स्पर्श केल्यानं आणखीनच जास्त होतात ‘पिंपल्स’, जाणून घ्या त्याबाबत सर्वकाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   चेहऱ्यावरील तेलाच्या ग्रंथींमधून बरेच तेल बाहेर पडते. यामुळे वातावरणातील धूळ, माती, दूषित घटक आणि कण चेहर्‍यावरील छिद्रांमध्ये जमा होतात. हळूहळू, ते मुरुमांचे रूप घेऊ लागतात. तरूणांमध्ये त्वचेच्या समस्या अधिक आढळतात. या परिस्थितीत काय करावे.. याबाबत जाणून घ्या

१) चेहरा स्वच्छ ठेवा –  त्वचेला तेलकटपणामुळे आणि त्वचेत तेल निर्माण झाल्याने तेलकट ग्रंथींचे छिद्र रोखल्यामुळे अशी समस्या दिसू लागते. अशा परिस्थितीत चेहरा स्वच्छ ठेवावा. जेणेकरून चेहऱ्यावरील जमा झालेली घाण तेलकट ग्रंथींच्या आत जाऊ नये आणि त्वचेला संसर्ग होऊ नये. चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर सर्वात उपयुक्त आहे.

२) स्पर्श करू नका –  मुरुमांमध्ये प्रोपोनो वेक्टर मुरुम जंतू असतात. ते रोखण्यासाठी त्यांना वारंवार स्पर्श करु नका. कारण वारंवार स्पर्श केल्यावर, जिथे हात लागेल तेथे संक्रमण पसरते आणि समस्या वाढते. हा संसर्ग टाळण्यासाठी ताणतणावापासून दूर रहा आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतीही क्रीम लावू नका.

३) जंकफूड आणि मसालेदार गोष्टी हानिकारक –  जंकफूडमध्ये वापरलेले तेल चेहऱ्यासाठी हानिकारक आहे. जर कोणी फास्टफूड खात असेल तर त्यामध्ये असलेले तेल छिद्र आणि इतर चेहऱ्यावरील ग्रंथीमधून आत जाते. तेव्हा चेहऱ्याचे स्नायू देखील प्रभावित होतात. जंकफूडसह तेल-तूप आणि मसालेयुक्त पदार्थांचा वापर टाळा म्हणजे त्वचा स्थिर राहील. तेलकट पदार्थ त्वचेला तेलकट बनवतात ज्यावर कण चिकटतात.

लक्षात ठेवा –

सुरुवातीच्या टप्प्यात मुरुमांचे तोंडावर लहान पुरळ दिसू लागतात. त्यांना पुन्हा स्पर्श करू नका, अन्यथा संसर्ग वाढू शकतो. काही जण त्यांना नखे किंवा इतर वस्तूंनी फोडतात, हे चुकीचे आहे. हे करू नका अन्यथा तोंडावर डाग येऊ शकतात.