६ हजार रुपयांची लाच स्विकारताना तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – लाकूड व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडून ६ हजार रुपयांची लाच स्विकारताना तहसीलदार आणि दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज तहसील कार्यालयात करण्यात आली. तहसीलदार आणि लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

तहसीलदार संजय गोविंद पावसकर (वय -५७ रा. शिवाजी नगर कणकवली), लिपीक निलेश धाकु कदम (वय -३४ रा. कलमठ ता. कणकवली) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तहसीलदार आणि लिपीकाचे नाव आहे. याप्रकरणी कणकवली येथील ३१ वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे.

तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक असून झाड तोडणीकरिता आवश्यक असलेले मालकीहक्कांचे दाखले मिळणेकरिता प्रकरण सादर केले होते. त्याकरिता तहसीलदार पावसकर यांनी ६ हजार रुपये तर लिपीक कदम यांनी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तहसीलदार आणि लिपीकास पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मितीश्री केणी, युवराज सारनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जितेंद्र पेडणेकर, पोलीस कॉनस्टेबल अजित खंडे, प्रथमेश पोतनीस, अजित खंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक युवराज सारनोबत करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक