रवींद्र रसाळ यांची स्वारगेट विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांची स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’667662c7-ae63-11e8-a58d-577b30a06b85′]

एल्गार परिषदेविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे आहे. या तपासाची व्याप्ती खूप वाढली आहे. त्यात आरोपींनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपील केली आहेत. न्यायालयातील तारखांना हजर राहणे, पोलिसांचे म्हणणे सादर करणे तसेच तपास करणे हे मोठे काम आहे. त्यामुळे नेहमीच्या दैनंदिन कामाकडे त्यांना लक्ष देणे शक्य होणार नाही. दहीहंडी, गणेशोत्सवाची कामे सुरु झाल्याने त्यांचा तपास कामावर ताण येऊ नये, यासाठी त्यांच्या जागी रवींद्र रसाळ यांची नेमणूक करण्यात आली असून डॉ. शिवाजी पवार यांना पूर्ण वेळ तपासासाठी देण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडेमध्ये मोठी चोरी

रवींद्र रसाळ हे सध्या विशेष शाखेत कर्तव्य बजावीत आहेत. यापूर्वी ते वानवडी विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. रसाळ यांनी या पूर्वी पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ते सन २००७ च्या दरम्यान पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश

जाहिरात