ACP Sujata Patil Suspended | सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर राज्य सरकारनं केली ‘ही’ मोठी कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ACP Sujata Patil Suspended | एका प्रकरणात लाच घेताना अटक करण्यात आलेल्या मेघवाडी विभागाच्या (Meghwadi Police Division) सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील (ACP Sujata Patil Suspended) यांच्यावर शासनाने मोठी कारवाई केली आहे. लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Mumbai) 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली होती.

 

मेघवाडी (Meghwadi Police Station) आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्याची (Jogeshwari Police Station) जबाबदारी सुजाता पाटील यांच्याकडे होती. जोगेश्वरी येथील एका तक्रारदाराने स्वतः चा गाळा भाडेतत्वावर एका महिलेला दिला होता. तो गाळा त्यांनी 5 ऑक्टोबरला परत घेतला. मात्र, संबंधित महिलेने अन्य तीन जणांबरोबर गाळ्याचे कुलूप तोडून आता प्रवेश केला होता. त्यासंदर्भात मालकाने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील (ACP Sujata Patil Suspended) यांची भेट घेतली. आणि मदत मागितली. त्यावेळी गाळा ताब्यात घेतलेल्या महिलेकडून भविष्यात त्रास होऊ नये म्हणून सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाचेची (Bribe) मागणी केली होती अशी माहिती समोर आली होती. त्यापैकी दहा हजार रुपये त्याच दिवशी घेतले होते.

 

उर्वरित रक्कमेसाठी सुजाता पाटील त्यांच्याकडे तगादा लावत होत्या.
त्यामुळे तक्रारदाराने सुजाता पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
त्यानंतर सापळा रचत सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, विशेष न्यायालयाने सुजाता पाटील यांची जामिनावर मुक्तता केली होती.
त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक पोस्टही लिहिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपली बाजू मांडत हे प्रकरण फ्रॅब्रिकेटेड असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, राज्य सरकारकडून सुजाता पाटील  यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.

 

Web Title :- ACP Sujata Patil Suspended | assistant commissioner of police sujata patil suspended from service after bribe case arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा