ACP Trap News | 25 हजाराच्या लाच प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ACP Trap News | दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 24 हजाराची लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकास छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar ACB Trap) येथील अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहेत. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACP Trap News)

 

मच्छिंद्र बापूराव ससाणे PSI Machindra Bapurao Sasane (55, नेमणुक – सातारा पोलिस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar Bribe Case) असे लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व इतरांविरूध्द सातारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र बापूराव ससाणे यांच्याकडे आहे (Chhatrapati Sambhajinagar Crime News). गुन्हयात मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (ACP Trap News)

 

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सरकारी पंचासमक्ष पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र ससाणे (PSI Machindra Sasane) यांनी तक्रारदाराकडून तडजोडीअंती 24 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द सातारा पोलिस स्टेशनमध्ये (Satara Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACP SP Sandeep Atole),
अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe), पोलिस उप अधीक्षक मारूती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप राजपूत (PI Sandeep Rajput), पोलिस अंमलदार केवलसिंग गुसिंगे,
पोलिस बाळासाहेब राठोड आणि पोलिस दत्तात्रेय होरकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACP Trap News | Police sub-inspector in anti-corruption net in bribery case of 25 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा