फायद्याची गोष्ट ! 300 Mbps स्पीडनं अनलिमिटेड डेटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – ब्रॉडबँड कंपन्या सुद्धा टेलिकॉम कंपन्या प्रमाणे युजर्संना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन ऑफर आणत आहेत.  त्यामध्ये ACT फायबरनेटने एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्संना ३००Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. कंपनी अतिरिक्त चार्जही लावत नाही. कंपनीने या अगोदर अनलिमिटेड ऑफर लॉंच केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.

इमेलवरून कंपनीने या ऑफरची माहिती युजर्संना दिली आहे. कंपनीने ऑफर संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ऑफर सह युजर्संना सध्याच्या प्लानची स्पीड अपग्रेड करण्याची संधी सुद्धा दिली आहे. सर्वात आधी प्ले स्टोर मधून युजर्संना ACT फायबरनेटचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार आहे. या ऑफरचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एन्ट्री लेवल प्लानसाठी १०० एमबीपीएसचा स्पीड अपग्रेड दिला आहे. ही ऑफर देशभरात उपलब्ध आहे.

कंपनीच्या ACT Blaze प्लानमध्ये युजर्संना 100Mbpsच्या स्पीडने ४५ जीबी डेटा दिला जाणार आहे. तर १०५९ रुपयांच्या या प्लानमध्ये ६ महिने किंवा १ वर्षापर्यंत सब्सक्राइब केल्यानंतर १५०० जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जाणार आहे. ACT फायबरनेटने नेटफ्लिक्स सोबत पार्टनरशीप केली आहे. त्यानंतर कंपनीने युजर्संना नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन वर एक्स्ट्रा डेटा आणि मोठा डिस्काउंट देत आहे.