ACTF ची वारजेतील ‘स्वच्छ’च्या कुटुंबांना मदत

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  मागिल 45 दिवसांपासून कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवसाय, उद्योग, कंपन्या बंद आहेत. सामाजिक भावनेतून अॅन्टी कोरोना टास्क फोर्सच्या वतीने वारजे-माळवाडी येथील स्वच्छच्या कुटुंबांना अन्न आणि मास्क देण्यात आले, असे प्रसिद्धीप्रमुख अमृत पठारे यांनी सांगितले.

पठारे म्हणाल्या की, ACTF महाराष्ट्र आणि गोवा प्रमुख व राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. पुणे शहर समन्वयक संजय गोळे व संतोष जाधव, दादा पाटील, मनोहर मिसाळ, महिला सहकारी अनिता चौधरी रुपाली कोळपकर यांच्या सहकार्याने नेचर डिलाईट क्लबअंतर्गत कृष्णा वारणा मित्र मंडळ व पीएनजी कर्मचारी ग्रुप यांच्या माध्यमातून वारजेमाळवाडी परिसरातील स्वच्छच्या कुटुंबाना अन्न व प्रत्येकी मास्क देण्यात आले. या कामासाठी सोमनाथ वाले, संदिप शिरसागर, संपत खैरे, अरविंद बोडके, सुधाकर बोरसे, शिवाजी घोरपडे, विनायक देशमुख, निवास माळी, चंद्रशेखर अराणके, सदाशिव एकसंम्बे यांचे विशेष सहकार्य लाभले, असे पठारे यांनी सांगितले. यावेळी ACTF च्या माध्यमातून योग्य वेळी आम्हाला मदत झाली अशी भावना स्वच्छच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.