‘कर्णबधीर’ असल्याची ‘अ‍ॅक्टिंग’ करून चोरटयाने लांबविला 4 लाखाचा ऐवज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्णबधीर असल्याची बतावणी करून 3 लाख 84 हजारांचे दागिने लांबविल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. चोरटयाने चक्‍क कर्णबधीर असल्याची अ‍ॅक्टिंग करून चोरीचे काम तमाम केल्याने ज्येष्ठ महिलेची भंबरी उडाली आहे.

याप्रकरणी कल्पना कृष्णा शिरकांडे (60, रा. घाटकोपर, मुंबई) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरकांडे यांची वयोवृध्द आई बिबवेवाडी परिसरातील कोठारी ब्लॉक येथील अनंत वसाहतीत रहावयास आहे.

शिरकांडे आणि त्यांचे पती त्यांना भेटण्याकरिता नियमित येत असतात. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कल्पना शिरकांडे, त्यांचे पती आणि त्यांच्या आई हे घरात होते. कल्पना यांनी मुंबईहून सोन्याचे दागिने आणले होते. दागिने असलेली पिशवी त्यांनी बाहेरील रूममध्ये ठेवली होती. त्याच रूममध्ये त्यांचे पती होते तर दुसर्‍या रूममध्ये त्या आणि त्यांच्या आई होत्या. काही वेळात एकजण शिरकांडे यांच्या घरात आला.

त्याने कर्णबधीर असल्याची बतावणी केली आणि शिरकांडे यांच्याकडे एक पत्रक दिले. पत्रक देवुन तो त्यांच्याकडे मदत मागत होता. दरम्रूान, कृष्णाजी शिरकांडे यांचे लक्ष त्या पत्रकामध्ये असल्याचे पाहून कर्णबधीराची अ‍ॅक्टिंग करणार्‍याने त्या रूममध्ये असलेली सोन्याच्या दागिन्याची पिशवी लांबविली. पिशवीत 3 लाख 84 हजार रूपयांचे दागिने होते. पोलिस चोरटयाचा शोध घेत आहेत.