शिरूर  : गौण खनिज उत्खनन करणाऱ्या १३ बोटींवर कारवाई

शिरूर  : पोलीसनामा ऑनलाईन

शिरूर तालुक्यातील पिंपळाचीवाडी येथे आज (दि. २) अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्या १३ बोटींवर शिरुर तहसील कार्यालयाने कारवाई केली. तहसीस काऱ्यालयाने केलेल्या या कारवाईत १३ बोटी नष्ट करण्यात आल्या.

अवैधरित्या होणाऱ्या गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने यामुळे पर्यावरणाची हानीही होत आहे. शिरुर तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईत अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्या दोषी व्यक्तीचे ५० ते ६० लाख रुपयांच्या साधन सामुग्रीचे नुकसान झाले आहे. सकाळी आठ पासून सुरु केलेली ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरु होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7fffef0d-c651-11e8-bd97-75e912f5ea8a’]
तहसील कार्यालयाकडून कारवाई होण्याची माहिती वाळू माफियांना आगोदर लागली होती. त्यामुळे शिरुर तहसील कार्यालयाचे अधिकारी कारवाईसाठी गेले असता त्या ठिकाणी एकही व्यक्ती आढळून आला नाही. सर्व वाळू माफिया फरार होण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या मोहिमेमध्ये तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह अधिकार व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
[amazon_link asins=’B07BHFT3VQ,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a3e87013-c651-11e8-8e1e-67c9fab36c08′]
कारवाईसाठी पथक नदी पात्रात धडकल्यानंतर वाळू तस्कर आधीच पळून जातात. परिणामी अनेक कारवाईमध्ये आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नाही किंवा पोलिसही आरोपींना पकडण्यासाठी तितकासा रस दाखवत नाहीत. अनेकदा जिल्हा प्रशासन आणि पोलिस मिळून संयुक्तरित्या गौण खनिज तस्करांवर कारवाईचा बडगा उगारतात. मात्र या कारवाईचाही कोणताही परिणाम तस्करावर होत नाही आणि गौण खनिजाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पहायला मिळते.