पुण्यात 4 दिवसामध्ये 2500 जणांवर कारवाई ! पोलीस आयुक्तांचे नागरिकांना स्वयंशिस्तीचे पालन करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात संचारबंदीचे इल्लंघनकरत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या तसेच मास्क न घालणाऱ्या अडीच हजार नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या चार दिवसात ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेदेखील मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालनकरून दिलेल्या सूचना पाळाव्या असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे काही भाग पूर्ण सील करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाऊनला शिथिलता मिळाली. यामुळे अनेक कंपन्या, दुकाने आणि ऑफिस सुरू झाले. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. त्यातून रस्त्यावर मोठी गर्दी होऊ लागली आहे. परंतु यामुळे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. तर नागरिक बाहेर पडताना काळजी घेतली जात नसून अनेकजण विनाकारण बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून जोरदार कारवाई केली आहे.

पोलिसांनी 2 हजार 432 जणांवर कारवाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे. यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असून, नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी मास्क वापर करावा, तसेच विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच गर्दी करू नये व एकमेकांमधील अंतर ठेवावे.

—चौकट—

विनामास्क- ७७८
विनाकारण फिरणे- ९०१
विनाकारण वाहने घेऊन फिरणे- ३३६ जप्त वाहने- २६२

—चौकट—

शहरात दुकाने उघडी ठेवण्यासाठी प्रशासनाने वेळा ठरवून दिला आहे. पण अनेकजण जास्त वेळ दुकाने उघडी ठेवत असतात. त्यानुसार पोलिसांनी जास्त वेळ दुकाने खुली ठेवल्याप्रकरणी ४५ खटले भरले असून, दुकानात सामाजिक अंतर न पाळल्याप्रकरणी ३ खटले दाखल केले आहेत.