मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 267 व्यक्तींवर कारवाई

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या कारणास्तव जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोरोना पासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.मात्र, तरीही शहरात मास्क न लावता वावरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे लोक आढळून येत असल्याने प्रशासनाने कारवाई केली आहे.

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 25 सप्टेंबर पर्यंत मास्क न वापरणाऱ्या 266 नागरिकांवर तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण 267 नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून इतर दंडात्मक कारवाई करत 91 हजार 900 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.