चीनी कंपनीचा उर्मटपणा ! ‘गो मोदी’ म्हणत भारतीय मजूरांना हिनवलं, कामावर घेतलं नाही, कंपनीवर ‘अ‍ॅक्शन’

बालाघाट : भारत सरकारची मिनी रत्न कंपनी मँगनीज ओर इंडिया लिमिटेड (MOIL) च्या बालाघाट खाणीत कार्यरत चीनी कंपनी चायना कोल 3 च्या विरूद्ध कडक अ‍ॅक्शन घेण्यात आली आहे. या कंपनीवर भारतीय मजूरांना कामावर घेत नसल्याचा आरोप आहे. ज्यामुळे कंपनीचे काम बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

चीनच्यासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चायनीज कंपनी चायना कोल 3 ने भारतीय मजूरांना कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा निमित्ताने कामावर घेतले नाही. यावरून मजूरांनी आंदोलन सुद्धा केले होते. यानंतर मॉयलमध्ये अडीचशे कोटी रूपये गुंतवून अंडरग्राऊंड शॉफ्टचे निर्माण करत असलेल्या या कंपनीचे काम थांबवण्यात आले आहे.

चीनी कंपनीला देण्यात नोटीसमध्ये स्पष्ट निर्देष दिले आहेत की, जोपर्यंत कंपनी भारतीय मजूरांना कामावर घेणार नाही, तोपर्यंत कंपनी भारतात काम करू शकणार नाही.

भारतीय मजूरांना काढून टाकल्यानंतर चीनी कंपनीवर अ‍ॅक्शन

मँगेनीज ओर इंडिया लिमिटेड (मॉयल) च्या भरवेली खाणीत हे मजूर मार्च 2019 पासून काम करत असलेल्या चायना कोल 3 कंपनीसाठी काम करत होते. या कंपनीने येथे खाणीच्या अंडरग्राऊंडमध्ये एक नवीन शॉफ्ट निर्मितीचा ठेका अडीचशे कोटी रूपयांना घेतला आहे.

लॉकडाऊनदरम्यान कंपनीचे कामसुद्धा बंद झाले होते. दहा दिवसांपूर्वी कंपनीने चीनशी सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान येथे पुन्हा काम सुरू केले. परंतु, यावेळेला पूर्वीपासून काम करत असलेल्या 62 भारतीय मजूरांना कामावर घेतले नाही.

यावरून मजूरांनी आवाज उठवला. या सरकारी व्यवस्थापनाने सुद्धा मजूरांना घेण्यासाठी कंपनीशी चर्चा केली. परंतु, कंपनी भारतीय मजूरांसोबत काम करण्यास तयार नव्हती.

भारतीय मजूरांना कामावर न घेण्याच्या कंपनीच्या या आडमुठेपणा नंतर अनेकदा कंपनीला भारतीय मजूरांना घेण्याचे निर्देश जारी केले गेले. परंतु त्यानंतरही कंपनीने ऐकले नाही. तेव्हा मॉयल व्यवस्थापनाने चीनी कंपनीविरूद्ध कडक कारवाई करत त्यांना काम बंद करण्याचे आदेश जारी केले. या आदेशात स्पष्ट लिहिले आहे की, जोपर्यंत कंपनी भारतीय मजूरांना कामावर घेणार नाही तोपर्यंत ही कंपनी येथे काम करू शकणार नाही.

सरकारने चीनी कंपनीविरूद्ध अ‍ॅक्शन घेतली आहे. देशाच्या आत काम करणारी कंपनी भारतीय मजूरांना बॉयकॉट करत होती, ज्यासाठी कोरोनाचे कारण सांगितले जात होते.

मात्र, कंपनी या स्थितीतही 40 पेक्षा जास्त चीनी मजूरांसोबत काम करत होती, ज्यावरून स्थानिकांनी मोठा संताप व्यक्त केला. त्यांची मागणी आहे की, या कंपनीचे टेंडर कायमस्वरूपी रद्द करावे.

कंपनीत काम करणारा मजूर विजय तांदे यांने सांगितले की, आम्ही येथे एक वर्षापासून काम करत आहोत. आम्हाला कोणतीही नोटीस न देता चायनीज कंपनीने काढून टाकले. जेव्हा काम मागण्यासाठी आम्ही जातो तेव्हा आम्हाला, गो मोदी, बोलून आमची थट्टा केली जाते.

मॉयलचे व्यवस्थापक उम्मेद भाटी यांनी सांगितले की, येथील अंडरग्राऊंडमध्ये काम करत असलेली चीनी कंपनी आपल्या इंटर्नल प्रॉब्लममुळे भारतीय मजूरांना कामावर घेत नव्हती. आम्ही त्यांना अनेकदा सूचना दिली की, भारतीय मजूरांना कामावर घ्यावे, परंतु, तेव्हा सुद्धा न ऐकल्याने काम बंद करण्यात आले.