सराईत गुन्हेगार तिवारी स्थानबद्ध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कुप्रसिद्ध गुन्हेगार राजेश तिवारी याला घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. राजेश उर्फ मुन्ना रविशंकर तिवारी (23, रा. मोरेवस्ती, चिखली) असे कारवाई केलेल्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश याने भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्टल, लोखंडी रॉड, तलवार, चाकू, कोयता यांसारख्या जीवघेणी हत्यारे बाळगली आहेत. त्याच्यावर मागील चार वर्षात दंगा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जाळपोळ असे गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण, पोलीस नाईक गवारी, खरात यांच्या पथकाने राजेश तिवारी याच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, उपायुक्त स्मिता पाटील, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्फत पोलीस आयुक्तांकडे पाठवला. गुन्हे शाखेच्या वतीने एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पीसीबी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांनी सादर केला. त्यावर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शिक्कामोर्तब करत आरोपी राजेश तिवारी याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

Visit : policenama.com