अवैद्य धंद्यांविरुद्ध छापासत्र, १८ ठिकाणी कारवाई

२३ जणांना अटक २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध धंद्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत जिल्ह्यातील १८ ठिकाणी छापे टाकून २३ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये ५१ लाख ४८ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध दारू विक्री, जुगार व्यवसाय, अवैध वाळू चोरी व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशाने सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी ८ ते १० मे या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील १८ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यामध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, अवैध दारू, अवैध वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने, वाळूचा उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने, अवैध वाळू असा एकूण ५१ लाख ४८ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये शेवगाव पोलिस स्टेशनला चार, संगमनेर शहर पोलिस स्टेशन, तोफखाना पोलिस स्टेशन, भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन व श्रीरामपूर पोलिस स्टेशन येथे प्रत्येकी दोन आणि वांबोरी दूरक्षेत्र पोलिस स्टेशन, कोतवाली पोलिस स्टेशन, नगर तालुका पोलिस स्टेशन, श्रीगोंदा पोलिस स्टेशन, पारनेर पोलिस स्टेशन व पाथर्डी पोलिस स्टेशन येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे, असे पोलिस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like