पुण्याच्या ‘तुळशीबागे’तील व्यवसायिकांवर ‘पहिल्या’च दिवशी कारवाईचा ‘बडगा’, ‘परवाने’ केले जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून बंद असलेली पुणे शहरातील तुळशीबाग आणि मंडई शुक्रवारी (दि.5) सुर करण्यात आली. यामुळे पुणेकरांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी तुळशीबाग व मंडई सुरु करण्यापूर्वी प्रशासनाने काही नियम व्यवसायिकांवर घातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टन्सिंगसह सरकार व महापालिकेच्या आदेश व नियमांचे पालक करणे दुकानदार व नागरिकांवर बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही दोन्ही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले. पालिकने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने महापालीका अतिक्रमण विभागाकडून दहा व्यवसायिकांवर कारवाई करून त्यांचे परवाने जप्त करण्यात आले आहेत.

तब्बल दोन-अडीच महिने कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुार लॉकडाऊनमधून दिलासा देण्यात आला. महापालिकेने पुणे शहरातील तुळशीबाग आणि मंडई सुरु करण्यात परवानगी दिली. शुक्रवारपासून 200 गाळे आणि तुळशीबागेतील दुकाने सुरु झाली. त्यावेळी नियमांच उल्लंघन केल्यास दुकानाचे परवाने रद्द करण्याची तंबी अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली होती. मंडईमधील 200 गाळे धारकांनी महापालिकेकडे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे, सॅनिटायझेशन आदी नियमांचे पालन करण्याच्या अटी घालून परवानगी देण्यात आली होती. तसेच सुरक्षित अंतर राखण्यासाठी पांढरे पट्टे आखून देण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकाने मंडई आणि तुळशीबाग बाजारपेठ शुक्रवारपासून सुरु केली. तुळशीबागेत 350 दुकाने आणि 200 पथारीधाकर आहेत. एका आड एक दिवस दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमणे, ग्राहकांचे सॅनिटायझेशन करणे आणि शरीराचे तापमान तपासणे, असे नियोजन व्यवासायिकांना करण्यास सांगितले होते.