सिंहगड एज्यु संस्थेच्या खात्यांतून १४ कोटी ७९ लाख पीएफची रक्कम वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भविष्य निर्वाह निधीच्या पुणे विभागाने सिंहगड एज्युकेशन सोसायटीकडून कर्मचाऱ्यांची थकीत असलेली भविष्य निर्वाह निधीची १४ कोटी ७९ लाख ७८ हजार रुपये एवढी रक्कम वसूल केली आहे. पीएफ विभागाने संस्थेचे नाना पेठ शाखेतील पंजाब नॅशनल बँकेतील खाते संलग्न करून ही रक्कम वसूल केली आहे.

याप्रकरणात सिंहगड शिक्षण संस्थेकडून ईपीएफओचे मार्च २०१४ ते मार्च २०१६ या कालावधीतील १४ कोटी ९२ लाख एवढी रक्कम थकीत होती. एम्पलॉईज प्रॉविडन्ट फंडस एन्ड मिसेलेनियस प्रोविजन अक्ट १९५२ नुसार संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पीएफची ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. संस्थेने या कालावधीत न भरलेल्या रकमेबाबत चौकशी सुरु आहे. तसेच एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंतची थकीत रकमेबाबतही चौकशी सुरु असल्याचे भविष्य निर्वाह निधीच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.