पुण्यातील प्रसिद्ध ‘येवले चहा’ वर अन्न व औषध प्रशासन (FDA) ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अल्पावधितच नावालौकिक मिळविलेल्या चहा प्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या पुण्यातील येवले अमृततूल्य व साईबा अमृततुल्यच्या शाखांवर कारवाई करत त्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

विना परवाना किंवा विना नोंदणी चहा विक्री करणाऱ्या अमृततूल्य व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धक मोहिम हाती घेतली आहे. त्यावेळी येवले अमृततूल्य व साईबा अमृततूल्य यांच्या शाखांमध्ये अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ अंतर्गत जनहित व जनआरोग्य यांच्या दृष्टीने अत्यंत महत्तवाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर येवले अमृततूल्यच्या बुधवार पेठ तर साईबा अमृततूल्यच्या नाना पेठ, धनकवडी, भारती विद्यापीठ येथील शाखांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना विक्रीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश अन्न व औषधे प्रशासनाने दिले आहेत. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार बंधनकारक आहे. अन्न व सुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होत असल्यास किंवा कोणत्याही अन्न आस्थापनाबाबत तसेच अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध सह आयुक्त सुरेश देशमुख यानी केले आहे.

ही कारवाई सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली सहायक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी, इम्रान हवालदार, सोपान इंगळे यांनी केली.

अशाप्रकारची कुठलीही कारवाई येवले अमृततुल्य च्या कुठल्याही शाखेवर झालेली नाही. येवले अमृततुल्य च्या सर्व शाखां वर कायदेशीर पणे FDA साठी लागणार्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे मत येवले अमृततूल्य यांनी साेशल मीडिया द्वारे व्यक्त केले आहे.