गणेशोत्सवात प्लास्टिक आणि थर्माकोल वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितल्याने प्रशासन जागे झाले आहे. चार दिवसात प्लास्टिक आणि थर्माकोल वापरणाऱ्या १३.दुकानदारावर कारवाई करून ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गणेश उत्सावादरम्यान महापालिकेने प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदीवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. प्रभागनिहाय कारवाई सुरु आहे. मंगळवार (दि.११) ते शुक्रवार (दि.१४) या चार दिवसात ३६८ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ दुकानांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महिलांवरील अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन का बाळगलेय : खा. सुळे
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f9af9efd-b8a9-11e8-b44d-83741792dc5f’]
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पाच दुकानांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला. तर, सहा किलो प्लास्टिक आणि तीन किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एका दुकानावर कारवाई करत पाच हजार रुपये दंड वसूल केला असून चार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १६२ दुकानांची तपासणी करण्यात आली.
[amazon_link asins=’B01DDP83FM,B0756RCTK1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff88f741-b8a9-11e8-ac47-bf72b290e6f2′]
‘ड’,  ‘इ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रत्येकी एका दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असा १५ हजार रुपये दंड वसूल केला असून बारा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दोन दुकानांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आणि एक किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दोन दुकानांवर कारवाई करत त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आणि एक किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.