‘फोन-टॅपिंग’बाबत कारवाई झालीच पाहिजे, तत्कालीन भाजप सरकारमधील ‘गृह’ राज्यमंत्र्यांचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवं सरकार आल्यानंतर भीमा कोरेगाव कारवाई आणि भाजपकडून विरोधी पक्षांचे फोन टॅपिंग हे प्रकरण आता चिघळायला लागले आहे. यावर बोलताना तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दोन्ही बाबींवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, फोन टॅपिंग बाबत तर मला कोणतीही माहिती नव्हती, कारण राज्यमंत्र्यांना मर्यादित अधिकार असतात, आणि गृह राज्यमंत्री म्हणून मी प्रामाणिक पणे काम केले.

तत्कालीन भाजप सरकार मधील गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते तर गृह राज्य मंत्री पद शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्याकडे होते. दीपक केसरकर भाजपकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या फोन टॅपिंगवर म्हणाले की, फोन टॅपिंग बाबत मला कोणतीही माहिती नव्हती, कारण राज्य मंत्र्यांना मर्यादित अधिकार असतात, गृहराज्य मंत्री म्हणून प्रामाणिक पणे काम केलं. तंत्रज्ञानाचा गैरवापर होणं चूकीचं आहे. फोन टॅपिंग बाबत कारवाई झाली पाहिजे. काँग्रेस सत्तेत असताना देखील फोन टॅपिंग होत होते असेही ते म्हणाले.

भीमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणी पुरावे पोलिसांकडे आहेत. याच पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात आली. डाव्यांच्या विरोधात पोलिसांकडे पुरावे होते असे ही दीपक केसरकर म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like