ड्रग्ज तस्करी प्रकरण ; पोलीस अधिकाऱ्यासह १६ पोलिसांवर कारवाई

अगरतळा : वृत्तसंस्था – त्रिपुरामध्ये मादक द्रव्यांच्या वाहतुकीत कथित सहभाग असल्याच्या आरोपाखाली पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२५) पोलीस उप निरीक्षक सुशिल देबब्रमा याच्या घरातून १० लाख १ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलीस दलातील अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांवर निलंबन आणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

ड्रग्ज आणि गांज्याच्या विरोधात चालवण्यात आलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत २७ जून रोजी पश्चिम अगरतला पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मधवी देबब्रमा नावाची महिला हेऱोईन तस्करी करणाऱ्या गँगमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अगरतळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सुब्रत चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने कृष्णनगर येथील माधवीच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून माधवीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने ब्राऊन शुगर तस्करी करणाऱ्या गँगमध्ये काम करत असल्याची माहिती तीने दिला. तसेच या धंद्यातून मिळालेले पैसे नातेवाईकांच्या घरातमध्ये ठेवले असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच माधुरी हीच्या सोबत तिची बहीण लक्ष्मी देखील या गँगमध्ये सहभागी असून ती ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

यानंतर पोलिसांनी विशेष शाखेच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक सुशील देबबर्मा याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्या घरातून १० लाख १ हजार रुपयांची रोकड जप्त केली. सुशील आणी माधवी या दोघांना पोलिसांनी अटक केली असून अंमली पदार्थाची तस्करी आणि गुन्ह्यात मदत करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

देबबर्मा यांच्यासह आत्तापर्यत पोलीस उपायुक्त, पोलीस उपनिरीक्षक व साहय्यक पोलीस निरीक्षकासह १६ पोलिसांना ड्रग्जच्या तसकरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ड्रग्जच्या या व्यवसायात आत्तापर्य़ंत पोलिसांना अटक करण्यात आली आहे तर काही पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.

९ महिन्यात ६५ हजार किलो गांजा जप्त
गेल्या ९ महिन्यामध्ये विविध सुरक्षा एजन्सींनी ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विविध सुरक्षा एजन्सीनी जप्त केलेल्या अंमली पदार्थामध्ये ६५ हजार किलो गाजा, २ कोटी रुपयांचे गांजाचे झाडं, १ लाख वेगवेगळ्या खोकल्याच्या औषधांच्या बटल्या, २ हजार ६२६ ग्रॅम ब्राऊन शुगर आणि हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.