रस्त्यावर ‘tik-tok’ करणं भोवलं, ५ अल्पवयीन मुलांवर कारवाई !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्यावर ‘टिक टॉक’चा व्हिडिओ करणे अल्पवयीन मुलांना महाग पडले आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सदर मुलांना आज रात्री ताब्यात दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांच्या पालकांना समज देण्यात आली आहे.

शहरातील गंगा उद्यान शेजारी रोडवर पाच अल्पवयीन मुले भर रोडवरच tik-tok शूटिंग करीत होते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना याचा त्रास होत होता. कोणाचीही पर्वा न करता ही मुले आपल्या tik-tok करण्यावर दंग होते. याची माहिती पोलिसांना कळताच स्वतः पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकाने गंगा उद्यान शेजारील रोडवर जाऊन पाच मुलांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुले असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

सदर मुलांच्या वर्तनामुळे किरकोळ अपघात होऊ शकतात, ही शक्यता गृहित धरुन सदरची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात रस्त्यावर टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like