अहमदनगर : स्कूल बसेसवर कारवाईचा बडगा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूलबसवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आतापर्यंत २० स्कूल बसेसवर ‘आरटीओ’च्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे अपघात टाळण्यासाठी कारवाईचे हत्यार उपासण्यात आले आहे.

शहरासह दक्षिण जिल्ह्यात शाळांच्या मालकीच्या २१० व खासगी मालकीच्या ३३२ स्कूल बसेस आहेत. एकूण ५४२ स्कूलबसेसद्वारे शालेय मुलांची वाहतूक केली जाते. अनेक स्कूल बसेस चालक नियमांचे उल्लंघन करतात. त्यातून अपघातही होतात. हे टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शाळेच्या गेटवर थांबून स्कूलबसची तपासणी सुरू करण्यात आली आहे. स्कूलबसकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात आहे का, बसचे रजिस्ट्रेशन केले आहे का, फिटनेस प्रमाणपत्र, इतर सुरक्षेच्या संबंधित उपाययोजना आदी नियमांचे पालक होते की नाही, हे तपासले जात आहे.

या मोहिमेत आरटीओच्या पथकांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या २० बसवर कारवाई केली आहे. वाहतुकीचा परवाना नाही, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक अशा काही त्रुटींमुळे कारवाई केली असून यातील काही बस जप्त करण्यात आल्या आहेत. स्कूलबस तपासणी मोहीम सुरुच राहणार आहे, असे परिवहन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?