मुंबई : Action On Faulty Helmets | मागील काही वर्षांपासून रस्ते अपघातात बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने दुचाकी धारकांना हेल्मेटची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मटची सक्ती करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये दुचाकीवर दोन्ही व्यक्ती हेल्मेट वापरतात.
जर तुम्ही हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागतो. पण आता हेल्मेट घालूनही तुम्हाला दंड द्यावा लागू शकतो. यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार देशभरात निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटवर कारवाई करण्याचा विचार करत आहे. निकृष्ट दर्जाचे हेल्मेट हे रस्ते अपघातात मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमुख आहे. (NDA Modi Govt)
केंद्र सरकारने याबाबत राज्यांना पत्र पाठवले आहे. राज्यांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना ISI नोंदणी शिवाय हेल्मेट विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने आपल्या पत्रात म्हंटले आहे की, हेल्मेट बीआयएस प्रमाणपत्राशिवाय रस्त्याच्या कडेला विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
बीआयएस लायसन्स आणि बनावट आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट तयार करून विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाचे हेल्मेट बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या देण्यात आले आहेत.
भारतात बनवलेल्या औद्योगिक उत्पादनांना ISI चिन्ह दिले जाते. ते हे दर्शविते की एखादे उत्पादन भारतीय मानक ब्युरो (BIS) ने विकसित केलेल्या भारतीय मानकांशी सुसंगत आहे. त्यामुळे यापुढे हेल्मेट विकत घेताना किंवा तुमच्याकडील हेल्मेट हे ISI प्रमाणपत्राच आहे का हे पाहून घ्या. अन्यथा तुमच्यावही कारवाई होण्याची शक्यता आहे.
भारतात सरकारने दुचाकी वाहनांमध्ये हेल्मेट घालणे बंधनकारक केलं असून दुचाकीवर दोन जणांना बसण्याची परवानगी असून दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. एवढंच नाही तर वाहन कंपन्यांकडून दुचाकी खरेदी करताना हेल्मेटही दिले जाते.
जगात सर्वाधिक दुचाकी या भारतात वापरल्या जातात. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये देशात ६३११५ रस्ते अपघातांमध्ये २५२२८ लोकांचा जीव गेला आहे. यापैकी सर्वाधिक अपघात दुचाकी वाहनांमुळे झाल्याची नोंद आहे.
२०२३ च्या तुलनेत, २०१४ मध्ये रस्ते अपघातात २०.४ टक्के आणि मृत्यूंमध्ये १०.७ टक्के वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गंभीर समस्येसंदर्भात केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Puja Khedkar | पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा; IAS पद परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा