इंदापूर शहरात गुटख्यावर कारवाई; 90 हजाराचा गुटखा जप्त

इंदापूर, पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर शहरात अवैद्य गुटख्याच्या साठ्यावर धाड टाकून नव्वद हजार दोनशे सोळा रुपयांचा गुटखा जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

याबाबत पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी बाळकृष्‍ण अंकुश यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 22 मार्च रोजी शेख इंटरप्राईजेस येथे तपासणी केली असता इम्रान हुसेन शेख (वय 34 वर्षे ) राहणार- चाळीस फुटी रोड, इंदापूर यांच्या दुकानात जन आरोग्याच्या दृष्टीने पंधरा हजार रकमेची चंदन सुंगधी सुपारी 250 पाकिटे , 24 हजाराची राजु इलाईची सुपारी 400 पाकिटे , 29016 रक्कमेची यशराज 1110 सुगंधी सुपारी 372 पाकिटे ,22 हजार दोनशेची रत्ना नं.300 सुगंधी तंबाखु 120 पाकिटे , गुटखा पान मसाला इतर तत्सम पदार्थ मावा खरर्रा याच्यावर बंदी असताना देखील जवळपास 90 हजार 216 रुपयाचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा मिळून आला.

सदर साठा कुठून आणला याची माहिती उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे इम्रान शेख याच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील उत्पादकाचा व पुरवठादाराचा तपास व्हावा यासाठी हा गुन्हा इंदापूर पोलिसांकडे वर्ग केला असून पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.