पालकमंत्र्यांच्या तालुक्‍यात वाळू तस्करांवर धाडसी कारवाई !

दहा जणांना अटक : 8 ट्रॅक्टरसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जामखेड तालुक्यातील वाकी शिवारातील खैरी नदीपात्रात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाळू तस्करांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल दहा जणांना अटक करून, ८ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत ४३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या तालुक्यात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. खैरी नदी पात्रात, वाकी शिवार, ता. जामखेड येथे वाळूची तस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यावरून पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब मुळे, विजयकुमार विठेकर, संदीप पवार, संदीप घोडके, रोहित मिसाळ, विनोद माशाळकर, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने आज दुपारी घरी नदीपात्रात छापा टाकला. या छाप्यात ८ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. काही वाहन चालक वाहन जागेवर सोडून पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करून पळून गेलेल्यांना पकडले. एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी चालक तुकाराम सिताराम गोपाळघरे (वय २६, रा. नागोबाची वाडी, ता. जामखेड), मालक भानुदास प्रल्हाद गोपाळघरे रा.नागोबाची वाडी, ता. जामखेड (फरार), तसेच महिंद्रा लाल रंगाचा ५७५ डी आय वरील चालक गणेश सतीश जगताप, वय ३४, रा. वाकी, ता जामखेड, याने मालक नितीन कांतीलाल जगताप, वय ३२, रा. वाकी, ता जामखेड याचे सांगणेवरुन, तसेच लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर २७५ डी आय वरील चालक दत्ता शामराव डोके, वय ३५, रा. खर्डी, ता जामखेड, मालक राम विठ्ठल भोसले, रा. खेड, ता. जामखेड (फरार), निळे रंगाचा सोनालीका डी आय ७५० या वरील चालक सुरज भागवत भुते, वय २०, रा. खड, ता जामखेड, मालक सोमेश्वर अशोक सोरटे, वय २८, रा. वाकी, ता. जामखेड यांचे सांगणेवरुन तसेच हिरवे रंगाचा जॉनडीअर ५०५० डी हि वरील चालक महेश राजू डोखे, वय २०, रा खड, ता जामखेड, मालक नामदेव वाबासाहेब जोरे, रा. खड, ता जामखेड (फरार), हिरवे रंगाचा जॉनडीअर ५०५० डी हि वरील चालक रावसाहेब आण्णा सुरवसे, वय ३३, रा. खड, ता. जामखेड, मालक मदन पांडुरंग गोल्हेकर, रा. खड, ता जामखेड (फरार) यांचे सांगणेवरुन तसेच लाल रंगाचा महिंद्रा अर्जुन अल्ट्रा १६०५ डी आय ट्रॅक्टरवरील चालक विजय जगन्नाथ सावंत, वय ३२, रा. वाकी, ता. जामखेड, मालक नंदकुमार जगन्नाथ सावंत वय ३५, रा. वाकी, ता. जामखेड, निळे रंगाचा स्वराज ७४४ ही वरील चालक मालक भिमराव प्रल्हाद गोपाळघरे वय ४०, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७९,३४ सह पर्यावण कायदा कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.