शिक्षकाने पसरवली सोशल मीडियावर अफवा, शिक्षकावर कारवाई

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

सोशल मीडियावर खाेटी माहिती टाकून अफवा पसरवणे एका शिक्षकाच्या अंगलट आले आहे. अफवा पसरवल्या प्रकरणी शिक्षकावर बीड पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. दादासाहेब सूर्यभान जाधवर (वय – ४०, रा.वडवणी) असे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a0b3a027-ad2d-11e8-8d79-4dca4732d334′]

जाधवर हे वडवणी येथील सिंदफणा माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. ३० ऑगस्ट रोजी जाधवर यांना टाकरवण येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंद अशी पोस्ट टाकली. त्याची कुठलीही शहानिशा न करता ती पोस्ट जाधवर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली.
[amazon_link asins=’B01N4J3WAE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a97f5d5b-ad2d-11e8-a898-11bb5361ddfe’]

हा प्रकार बीड पोलिसांना समजला. पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी प्रकरणाची शहानिशा करुन दादासाहेब जाधवर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी चूक झाल्याचे कबूल करताच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

वाचा आजच्या टॉप बातम्या