कारवाईचा ‘ऍक्शन’ प्लॅन तयार करा : पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या विधानसभा निवडणुकीसह सण, उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या. सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईचा ऍक्‍शन प्लॅन तयार करावा, असे आदेश पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिले. दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा पोलिस दलातर्फे शर्मा यांच्याहस्ते हृद्य सत्कार करण्यात आला.

बुधवारी अधीक्षक शर्मा यांनी गुन्हे आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी सण, निवडणुकां याबाबत चर्चा करण्यात आली. गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करू नका, दाखल गुन्हे तत्परतेने उघडकीस आणा. शरीरविरुध्द व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे घडणार नाहीत, यासाठी दिवस, रात्रीची गस्त वाढवा, रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करा. गंभीर गुन्हयाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तातडीने हे गुन्हे उघडकीस आणावे असे आदेशही अधीक्षक शर्मा यांनी दिले.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांची बदली झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त 25 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बलात्कार करुन, खुन केल्याच्या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू ठामपणे मांडल्याबद्दल ऍड उल्हास चिप्रे यांचा सत्कार करण्यात आला. तर जुनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल इस्लामपूरच्या उपअधीक्षक तसेच विश्रामबागचे निरीक्षक अनिल तनपुरे यांना अनुक्रमे 25 हजार व 10 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक, प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी