पुण्यात विना मास्क फिरणार्‍या 48 हजार जणांवर कारवाई, 2 कोटी 40 लाखांचा दंड वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  ऐकतील ते पुणेकर कसले असेच म्हणायची वेळ आता प्रशासनावर आली असून, पंधरा दिवसात पुणे पोलीस व पालिका विभागाने मास्क परिधान न करणाऱ्या 48 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. केवळ 15 दिवसात ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत 2 कोटी 40 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाचा कहर असणारे पुणे शहर असल्याचे सांगण्यात येते. काही केल्या येथील संसर्ग कमी करता आलेला नाही. प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहे. पण संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे वास्तव आहे. त्याला महत्वाचे कारण मास्क परिधान न करणे हे एक असल्याचे म्हटले जाते. पोलीस व पालिका सतत नागरिकांना मास्क घालण्याच्या सूचना देत आहे. पण याकडे सरास दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे मास्क न घळणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पालिका व पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यात आता कडक कारवाई सुरू केली आहे. पण मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

पंधरा दिवसापासून (दि. २ सप्टेंबर) प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत चौकाचौकात दंडात्मक कारवाई केली जात आहे. सरासरी तीन हजारांवर विमानास्क नागरिकांवर कारवाई होत आहे. मागील १५ दिवसांत प्रशासनाने तबल ४८ हजार बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यात २ कोटी ४० लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

मास्कसोबतच अनेकठिकानी नागरिक एकत्रित बसत आहेत. तेथे सोशल डिस्टन्सचे उल्लंघन तर होत आहेत पण मास्क देखील न घालता नागरिक बिंदास फिरत आहेत. त्यामुळे शहरातील संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे जानकर सांगत आहेत.

दुसरीकडे कारवाईदरम्यान पोलिस व नागरिकांत वादावादी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाब्दिक चकमक झाल्यानंतर तू-तू, मै-मै वाढली आहे. अनेकांना रोजगार नसल्याने दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पोलिसांशी वादावादी होत आहे.

—कोट—

स्वसंरक्षणासह सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर आवश्यक आहे. पण, प्रवासात काहीजणांकडून मास्क परिधान केले जात नाही. यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे. अनेकदा नागरिक विविध कारणे देत कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांनी स्वयंसिस्थ लावत मास्क वापरावा, असे आवाहन स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी केले आहे.