Sangli News : इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत एसटी मालवाहतुकीचा ट्रक चालविणारा ताब्यात, पोलिसांची कारवाई

इस्लामपूर/ सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – येथील इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर एसटी चालक दारू पिऊन एसटी मालवाहतुकीचा ट्रक बेजबाबदारपणे चालवत नागरिकांचा जीव धोक्यात जाईल असे बेशिस्त वर्तन केल्याने त्याला पोलिसानी ताब्यात घेतळे आहे. वैद्यकीय तपासणीत त्याने दारू पिल्याचे स्पष्ट झाले आहे.

सूर्यकांत तुकाराम सोलनकर असे या एसटी चालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कलम २७९ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अरुण संपतराव पाटील यांनी ही फिर्याद दिली आहे.

बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पोलिसांची गस्त सुरू असताना येथील दूरसंचार कार्यालयासमोरील रस्त्यावरून सोलनकर मालवाहतूक करणारा एसटीचा ट्रक (एमएच १४ बीटी ०४१४) हा वेवस्थित चालवीत नसल्याचे पोलिसाच्या लक्षात आले.त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो तसाच पुढे निघून गेला. पोलिसांनी पाठलाग करून हा ट्रक थांबविला. तेव्हा चालक सोलनकर दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले.