सायलेंसरमध्ये बदल करू फटाक्याचा आवाज करणाऱ्या बुलेटराजावर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सायलेंसरमध्ये बदल करून फटाक्याचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या एका बुलेटराजावर हडपसर वाहतुक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यासोबतच त्याचा वाहन विमा संपल्याने त्याच्यावर ७ हजार ५०० रुपयांचा दंडांची कारवाई करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे सायलेंसरमध्ये बदल करून फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.

वैदवाडी येथील संकरमठ परिसरातील रस्त्यावर एमएच १२, एनजी १८३३ या क्रमांकाच्या बुलेटवर अजय जाधव (रा. रांका ज्वेलर्सजवळ, मगरपट्टा जंक्शन, हडपसर) हा त्याच्या बुलेटवरून आणखी दोघांना बसवून जात होता. परंतु त्याच्या बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल करून सायलेंसरचा फटाक्यासारखा आवज करत तो जात होता. त्यावेळी हडपसर वाहतुक विभागाच्या पथकाने त्याला थांबवून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याच्या बुलेटचा वाहन विमाही संपल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी त्यासंदर्भात पुणे आरटीओकडे कारवाईचा प्रस्ताव सादर केला. तेव्हा त्याला ७ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे.

सायलेन्सर मॉडीफाईज करण्याचे फॅड

बुलेट गाड्यांच्या सायलेन्सर मॉडीफाईड करण्याचे फॅड सध्या तरुणाईमध्ये आहे. परंतु शहरात अशा प्रकारे मॉड़ीफाईड सायलेंसर वापरणाऱ्या बुलेटस्वारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कर्णकर्कश आवाज करत शहरातून असे बुलेटस्वार फिरत असतात अशा बुलेटस्वारांवर कारवाई करण्याचे संकेत पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिले आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, कर्मचारी एस. आर. चव्हाण, एस. एम. रसाळ यांच्या पथकाने केली.