पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई ! पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून दरोडा टाकणार्‍या टोळीविरूध्द ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी केअर टेकर ब्युरोमार्फत (senior citizen care taker bureau) काम करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घराची रेकी करून दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीवर पुण्याच्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता pune police commissioner Amitabh Gupta यांनी मोक्का MCOCA (Mokka) कारवाई केली आहे. चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन मधील (chatursinghi police station) पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी (police officer and staff) या टोळीला अटक (arrest) केली होती.

Nana Patole on Sambhaji Raje and Prakash Ambedkar Meeting | नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका’

संदीप भगवान हांडे (वय 25),
मंगेश बंडू गुंडे (वय 20),
राहुल कैलास बावणे (वय 22),
विक्रम दीपक थापा उर्फ बीके (वय 19),
किशोर कल्याण चनघटे (वय 21) आणि
भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय 25) यांच्याविरूध्द मोक्का MCOCA (Mokka) कारवाई (Mokka Action) करण्यात आली आहे.

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

पुण्यातील औंध येथील सिंध हौसिंग सोसायटीत (aundh sindh society pune) घुसून उच्चभ्रू बंगल्यातील ज्येष्ठ दांपत्याला (senior citizen couple) आणि त्यांच्या कुकला चाकूचा धाक दाखवून 15 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात (chatursinghi police station) गुन्हा (FIR) दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास करत या सहा जणांच्या टोळीला औरंगाबाद, जालना, आणि नाशिक (Aurangabad, Jalna, and Nashik) या तीन शहरातून अटक केली होती.
त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले होते.

Pimpri Chinchwad News | रिक्षाचालकांकडे 2 हजार रुपये खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जणांना अटक

संदीप हांडे हा टोळी प्रमुख आहे. तो आणि त्याच्या टोळी सराईत गुन्हेगार असून या टोळीवर औरंगाबाद, जालना आणि पुण्यात यापूर्वीचे सात गुन्हे दाखल आहेत.
आरोपी आधी केअरटेकर म्हणून संबंधित घरात जाऊन घराची रेकी करत आणि त्यानंतर दरोडे टाकत असल्याचे समोर आले होते.

या टोळीवर मोक्का लावण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे, उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख (Deputy Commissioner of Police Pankaj Deshmukh) यांच्याकडे पाठ्वला होता,
त्यांनी याबाबत पाहणी करून तो अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण Additional Commissioner Namdev Chavan) यांच्याकडे पाठवला.
त्यांनी छाननी करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता Police Commissioner Amitabh Gupta  यांच्या आदेशानुसार या टोळीवर (gang) मोक्कानुसार कारवाई केली आहे.

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 34 टोळ्यांवर मोक्का MCOCA (Mokka) लावला आहे.
तर या वर्षातला हा 29 वा मोक्का आहे.
गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक पावले उचलले आहेत.
त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांत दहशत निर्माण झाली आहे.

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Web Title: Action taken by Pune Police Commissioner Amitabh Gupta! ‘Mocca’ against gang who robbed senior citizens of Pune by doing configuration